शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन, त्याच्याशिवाय बातम्याच होत नाही : संजय राऊत

Sharad Pawar-Sanjay Raut

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करण्याची सध्या फॅशन झाली आहे. त्याशिवाय बातम्याच होत नाहीत, या शब्दात शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे . चंद्रकांत पाटलांवर (Chandrkant Patil) देखील त्यांनी निशाणा साधला . ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते .

ही बातमी पण वाचा : स्वबळावर सत्तेत येणार असाल तर शुभेच्छा, संजय राऊतांचा काँग्रेसला टोमणा

शरद पवार हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहे. स्वतःच्या पक्षासह आघाडीतील घटक पक्षांवर देखील त्यांचा कंट्रोल आहे. त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडेही जातो असे मत मराठा आरक्षणावर बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील व्यक्त केले होते. त्यावर राऊत यांनी पलटवार केला आहे .

चंद्रकांत पाटील हे वसंतदादा पाटील नाहीत. पण कोणी किती वैयक्तिक बोलावं याचा विचार करायला हवा.शरद पवारांवर आरोप केल्याची सध्या फॅशन झाली आहे. त्याशिवाय बातम्या होत नाहीत. आगामी काळात होणारी निवडणुकांमध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी काही तरी नक्की असणार आहोत, असे राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button