‘कंगनाच्या बंगल्यावर झालेल्या कारवाईचा माझा संबंध नाही’, संजय राऊतांचे न्यायालयात उत्तर

Sanjay Raut-Kangana Ranaut

मुंबई : वैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेनं (BMC) कारवाईचा बडगा उगारला होता. महापलिकने अवैध बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्चन्यायालयात गेले होते. अखेर या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली आहे. उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

तर, ‘या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असं उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी न्यायालयात सादर केले आहे. तसंच, जे काम अनधिकृत होते, त्याच्यावर पालिकेनं केलेली कारवाई योग्यच होती’, या मतावर मुंबई पालिका ठाम आहे. मुंबई उच्चन्यायलयाने दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेनं कंगना राणावत हिच्या वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई पालिकेनं माझ्या बंगल्यावर केलेली कारवाई ही बेकायदेशीर आणि सूडापोटी होती, असा दावा कंगनाच्या वकिलांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER