‘एक शरद, सगळे गारद!’ संजय राऊतांनी केला मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध

मुंबई :- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एक मुलाखत घेतली असून त्यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदींचा लेह दौरा हा जवानांचे मनोधैर्य वाढवणारा : शरद पवार  

एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. तसंच या मुलाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. तसेच त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे.

राज्यातील तीन पक्षांच्या सरकारविषयी संभ्रमाचं वातावरण असताना, विरोधकांकडून सरकारच्या भवितव्याबाबत उलटसुलट वक्तव्ये केली जात असताना पवारांची ही मुलाखत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं या मुलाखतीकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER