पाठीत खंजीर खुपसण्याची शिवसेनेला सवय नाही; मात्र…संजय राऊतांचा पुन्हा इशारा

Sanjay Raut shivsena

मुंबई :- खेड पंचायत समितीच्या (Khed Panchayat Samiti) सदस्यांना फोडल्यावरून शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच संतापले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी सेनेची सत्ता उलथवून टाकली. यावरून संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. पाठीत खंजीर खुपसण्याची शिवसेनेला सवय नाही. मात्र अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीव्ही-९ मराठीशी बोलताना दिला.

राऊत म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहे. राज्यात एकत्र सरकार चालवताना इतरही ठिकाणी नैतिकता पाळावी लागेल. एकत्र राहून एकमेकांचे पाय कापण्याचे काम होऊ नये. अन्यथा नैतिकता केवळ शब्दांपुरते सीमित राहील. शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत. असे वाद निर्माण होऊ नये यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा. हे सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री आपले आहेत. केवळ शिवसैनिकांना अडवण्याचे काम का केले जातात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. न्याय हा सर्वांसाठी सारखा असावा, असे म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांवरही निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. महाविकास आघाडीत समन्वय आहे. मात्र काही मुद्द्यावर घोळ होत असतात. यापुढे असे घडू नये यासाठी तिन्ही पक्षांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा सदस्य नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका बजावत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: देवही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीच्या आमदाराला सत्तेची मस्ती, पुढच्यावेळी शिवसेना त्यांना पाडणार; संजय राऊत भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button