‘बाबरी आम्हीच पाडली हे लक्षात असू द्या !’ संजय राऊतांचा कंगनाला पुन्हा इशारा

Kangna Ranaut-Sanjay raut-Uddhav Thackeray

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा संघर्ष बघायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यावरून ही ठिणगी पडली होती. त्यानंतर आज कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मनपानं जेसीबी(JCB) चालवली. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना (Babari Sena) म्हटले.

कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, कंगनाच्या बंगल्यावर करण्यात आलेल्या कारवाईचं उत्तर केवळ महापालिका आयुक्तच देऊ शकतील. जर कुणी कायदा मोडत असेल, त्याच्यावर कारवाई केली जाते. अशा वेळी पक्षाकडे माहिती असावी हे गरजेचं नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी काय म्हटलं आहे, याबद्दल मला माहिती नाही. माझ्यासाठी अभिनेत्रीसोबतचा वाद संपला आहे. विधानसभेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे.

गृहमंत्र्यांनीही याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कायदा काम करत असताना माझं बोलणं बरोबर नाही, असं राऊत म्हणाले. कंगनानं केलेल्या बाबर सेना उल्लेखावरून संजय राऊत यांनी सुनावलं. राऊत म्हणाले की, “बाबरी पाडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय म्हणत आहे. कंगना रणौतशी माझं वैर नाहीये. ती एक कलाकार आहे. मुंबईत राहते. पण ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे, ती कदापि सहन करण्यासारखी नाही.

कंगनानं जर आपलं म्हणणं मागं घेतलं, तर वाद राहणारच नाही, असं संजय राऊत म्हणाले. महापालिकेनं केलेल्या कारवाईचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहचलं आहे. त्यामुळे महापालिका न्यायालयात उत्तर देईल. कारवाईमागे कुठलीही सुडाची भावना नाही. मुंबईत देशभरातून आलेले लोक राहतात, असंही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER