देवेंद्र फडणवीसांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच कळेल : संजय राऊतांची माहिती

मुंबई :- सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली होती. या भेटीनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही भेट ‘सामना’तील मुलाखतीसंदर्भात असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. यावरून फडणवीस सामना दैनिकासाठी कधी मुलाखत देतील, हे लवकरच कळेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

राऊत यांनी फडणवीसांच्या सामनातील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच सुटेल, असे वक्तव्य केले. त्यामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस ‘सामना’लाही मुलाखत देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. २६ सप्टेंबर २०२० रोजी शिवसेना खासदार संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती. त्यामुळे या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता.

मात्र, एका वृत्तपत्राच्या रिपोर्टरने जेव्हा त्यांना तपशीलवार माहिती दिली. तेव्हा मात्र, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो, पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील तर त्याची मला माहिती नाही, असे राऊत यांनी सांगितले होते. मात्र, त्याच वेळी दैनिक ‘सामना’मध्ये लवकरच फडणवीस यांची मुलाखत छापून येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते.

ही बातमी पण वाचा : …तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button