आता सुशांत सिंह प्रकरणाचे काय झाले, असे विचारावे लागेल; संजय राऊतांचा सीबीआयला टोला

Sushant Singh case-Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून सीबीआयला धारेवर धरले आहे. सीबीआय (CBI) कुठेच दिसत नाही त्यामुळे तपास पुढे जाईल असं वाटत नाही. मारुती कांबळेचं काय झालं ? तसं आता मुंबई, महाराष्ट्राच्या लोकांना बिहारच्या पोलिसांना, तेथील राज्यकर्त्यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बिहार निवडणुकीत सुशांत सिंह प्रचाराचा मुद्दा असावा म्हणूनच तर केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून राजकारण केलं. जेडीयूने आतापासूनच सुशांतच्या नावे पोस्टर छापून प्रचारात आणले आहेत. विकासाचा कोणताही मुद्दा नाही, कामासंदर्भातील मुद्दे नाहीत, सुशासन नाही म्हणून मुंबईतील मुद्दे प्रचारात आणले आहेत. तेथील राज्याच्या पोलीस प्रमुखांनी या नाट्यात पडदे ओढण्याचं काम केलं. राजीनामा दिला असून बक्सरमधून ते निवडणूक लढत आहेत. सुशांत सिंह प्रकरणात हे सर्व आधीच ठरलं होतं, त्याप्रमाणे नाट्य पुढे चाललं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ही बातमी पण वाचा : रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामिनावर होणार एकत्रित सुनावणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER