सुशांत प्रकरणी काही लोकांच्या पडद्यामागून हालचाली : संजय राऊत

Sanjay Raut - Sushant Singh Rajput - Nitish Kumar

मुंबई : सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) तपास सुरू असताना बिहार सरकार सीबीआयची (CBI) मागणी करते, केंद्र सरकार त्याला लगेच मान्यताही देते. ज्या पद्धतीने घडामोडी घडवल्या जात आहेत त्यामुळे संशय येत आहे. सत्य बाहेर येऊ नये यासाठी पडद्यामागून कोणी तरी हालचाली करत असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केला. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे राजकारण करण्यात येत आहे .

मुंबई पोलीस दल किती सक्षम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मग त्यांच्या तपासामध्ये हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे, असा सवाल विचारत पडद्यामागून कोण हालचाली करतंय याची मला माहिती आहे; पण मी आताच कुणाचीही नावं घेणार नाही. योग्य वेळी मी यावर बोलेन, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी भाजप (BJP) आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमारांवर (Nitish Kumar) हल्लाबोल केला.

सुशांत सिंग प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित करणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते, असं राऊत यांनी म्हटलंय. तत्पूर्वी ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधील सदरात राऊत यांनी पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली होती. सिनेक्षेत्रात दहशत निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा तपास खेचला नाही ना? असे राऊतांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER