उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री, हे मोदींनाही पटले : संजय राऊत

sanjay-raut - pm modi realize Competent CM thackeray 

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) (आज) बुधवारी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्याला भेट देणार आहेत. वादळाचा सर्वाधिक मारा बसलेल्या दीव भागाला ते भेट देणार असल्याचं म्हटले जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावे, अशी टीका राऊत यांनी केली .

तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असे राऊत म्हणाले .

जर देशात उद्या निवडणूक झाली तरी मोदी सरकार 400 जागा जिंकेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. पाटील यांच्या वक्तव्यावरून राऊत यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहे.

पाटील यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचे मला कौतुक वाटतं. त्यामुळे भाजपला 400 काय अगदी 500 जागाही मिळू शकतात. एवढंच काय ते जगभरातील पार्लामेंटसच्या सर्व जागा जिंकू शकतात, असा टोला संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला.

ही बातमी पण वाचा : ममता विरुद्ध सीबीआय ; मोदी-शहा आहेत तोपर्यंत तरी या संघर्षाला अंत नाही ; शिवसेनेचे टीकास्त्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button