बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का? संजय राऊत यांचा सवाल

मुंबई :- दिग्दर्शक अनुराग काश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasi Pannu) यांच्या कार्यालयावर धाडी मारण्यात आल्या आहेत. त्याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले .

देशात जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली तेव्हा तेव्हा सिने उद्योगातील लोकांनी सर्वात आधी आवाज उठवला आहे. परंतु आज देशात दडपशाही सुरू असताना बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज गप्प का आहेत? असा सवाल करतानाच आवाज उठवणं केवळ तापसी पन्नू किंवा अनुराग काश्यप यांचे काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे, असे आवाहनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बॉलिवूडला केले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर कोणी बोललं तर त्याला गुन्हेगार आणि देशद्रोही ठरवणं योग्य नाही. ही पद्धत बरोबर नाही. बॉलिवूडने अशा कारवायांना घाबरू नये. हा लोकशाही देश आहे. मोदी लोकशाही मार्गानेच सत्तेत आले आहेत.

लोकशाहीने येऊन कोणी हुकूमशाही राबवत असेल तरी हा लोकशाही देश आहे, असं सांगतानाच सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही, गळचेपीच्या विरोधात आवाज उठवायला हवा. केवळ अनुराग काश्यप आणि तापसीचं हे काम नाही. तुमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. इंडस्ट्रीत आज एकापेक्षा अधिक दिग्गज आहेत. ते गप्प का आहेत? असा सवाल राऊत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER