‘सर्वोच्च न्यायालयाचा आदर करायला हवा’, संजय राऊतांचा सावध पवित्रा

मुंबई : परमबीर सिंह (Parambir Singh) लेटरबॉम्बप्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मोठा दणका दिला. यासोबत न्यायालयाने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. या प्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती.

मात्र, या प्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयानंतर सुपर सर्वोच्च न्यायालय असा पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायला हवा, असं म्हणत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. तसेच परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असल्यानेच महाविकास आघाडी सरकारही चौकशी करणार होती. यासाठी राज्य सरकारकडूनही याचिका दाखल केली गेली होती, असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button