शरद पवारांच्या मातोश्री भेटीवरून गदारोळ व्हायचं कारण नाही – संजय राऊत

Mahavikas Aghadi - Sanjay Raut
  • महाराष्ट्रात सत्तेचे शिल्पकार, मार्गदर्शक शरद पवार आहेत.
  • पुढच्या पाच वर्षांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी भाजपाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोरोनाची स्थिती हाताळण्यास ठाकरे सरकार असमर्थ असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवल्यानंतर अचानक राजभवनावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत. काल शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ते थेट मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यास गेले. त्यांच्या मातोश्रीवर जाण्यावरून राज्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शरद पवारांच्या मातोश्री भेटीवरून गदारोळ व्हायचं कारण नाही असं स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यांमापुढे दिले आहे.

ही बातमी पण वाचा:- कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचाय : संजय राऊत 

शरद पवारांच्या मातोश्री भेटीवरून गदारोळ व्हायचं कारण नाही. शरद पवार यापुर्वीही मातोश्रीवर आलेले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार पुढील पाच वर्षे राहणार. आम्ही बैठकीसाठी शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी सुद्धा शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात. त्यामुळे पवारांच्या मातोश्री भेटीवरून कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही असे संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले.

तसेच, आम्ही पुढच्या पाच वर्षातही एकत्रच निवडणुका लढवणार असेही राऊत म्हणाले. कोरोनाच्या संकटातही विरोधकांना खेळ करायचे असतील तर, त्यांना शुुभेच्छा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER