एका कनिष्ठ अधिकाऱ्यामुळे सरकार चितपट होणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- सध्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस अधिकारी यांचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यांना निलंबित करण्यात आले असून, विरोधकांनी आता राष्ट्रपती राजवटीची मागणी लावून धरली आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार लवकरच पडेल असंही बोलले जात आहे. मात्र या सगळ्या गोष्टी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याची फेटाळून लावल्या आहेत. पोलीस विभागातील एका कनिष्ठ अधिकाऱ्यामुळे सरकार चितपट होईल असं होणार नाही. सरकारला साडेतीन वर्षे कोणीही चितपट करु शकणार नाही, असा दावा राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

एका एपीआयमुळे सरकार पडेल, या भ्रमातून विरोधकांनी बाहेर पडायला हवे. या सर्व प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. त्यामुळे त्याच्यात लक्ष घालण्याची गरज नाही. आमचं सर्व घडामोडींवर लक्ष आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठका होत आहेत हा विचार करु नका. खाते बदल हा मुख्यमंत्र्याच्या अधिकारातील विषय आहे. त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात. तीन पक्षांचं सरकार असल्याने तिन्ही पक्षाचे नेते याबाबत एकत्र बसून निर्णय घेतील.

शेरजील उस्मानीवर कोणती कलमं लावावी याचं मार्गदर्शन विरोधी पक्षनेते फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करावं, विरोधकांनी वकीलअसायला हवे. पैलवान चितपट झाला बोट वरती आहे, पण मी हरलो नाही हे कोणत्या पैलवानाबद्दल बोलतायेत. अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) प्रगती पुस्तकावर मुख्यमंत्री शेरा देतील, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझे प्रकरण : शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले …. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER