पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण : संजय राऊतांचा सावध पवित्रा; म्हणाले…

Pooja Chavan - Sanjay Raut

मुंबई :- सध्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan) या युवतीच्या आत्महत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्याने शिवसेनेची (Shiv Sena) कोंडी करण्यासाठी भाजप पुढे सरसावली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावध पवित्रा घेत भाष्य केले. पण संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिसून येतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच (CM Uddhav Thackeray) या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असे त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER