संजय राठोड यांच्यावर शरद पवार नाराज?, संजय राऊत म्हणाले …

मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi crowd) गर्दी केली होती. या शक्तिप्रदर्शनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) नाराज असल्याची माहिती आहे. यावरच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असा मला यासंदर्भात कुठलीही माहित नाही, असे म्हणाले.

शरद पवार संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत, अशी कुठलीही माहिती माझ्याजवळ नाही. अशा चर्चा माध्यमांमध्ये होत असतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER