पहिल्याच दिवशी शेतकरी आंदोलनाचा प्रश्न निकाली लागायला हवा होता : संजय राऊत

मुंबई :- कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmer-Protest) आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. राज्याच्या २१ जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच १८० किलोमीटरपर्यंत रॅली काढत शनिवारी रात्री मुंबईत पोहचले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात सभा झाल्यावर आंदोलक आझाद मैदान ते राजभवनापर्यंत कृषी कायद्याविरुद्ध मोर्चा काढतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची पहिली फेरी, दुसरी फेरी असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरू आहे का? आशियाई गेम सुरू आहे का? खरे तर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता.

गेल्या ६० दिवसांपासून पंजाब, हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. पहिल्याच फेरीत न्याय मिळायला हवा होता. मला असे वाटतेय की, यामागे एक अदृश्य शक्ती आहे. जिला देशातील वातावरण बिघडवायचे आहे. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपाने तेव्हाच निर्णय घेतला असता तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. परंतु प्रजासत्ताकदिनापर्यंत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव आहे, असे राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : जे महाराष्ट्रात घडले, ते प. बंगालात घडत आहे, तोडफोड करुन विजयासाठी प्रयत्न सुरू – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER