नरेंद्र मोदींच्या हातात हुकमाची पानं , मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा : संजय राऊत

Sanjay Raut - PM Modi

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं असताना त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका मांडली आहे.

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असायला हवी. मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पाने आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, वारंवार भेटीची वेळ मागूनही पंतप्रधानांनी वेळ दिली नसल्याचे संभाजीराजे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

राज्यात एकीकडे खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत ठोस पावलं उचलण्याचा इशारा दिला असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button