अजित पवार स्टेपनी, तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे योग्य व्यक्ती – संजय राऊत

Ajit Pawar-Sanjay Raut-Uddhav Thackeray

पुणे : आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत. स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येऊ शकत नाही.

त्यामुळे आमचे सरकार टिकणार आणि लांबचा प्रवासही सोपा होणार, असे ‘सामना’चे संपादक, खासदार संजय राऊत म्हणाले. लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांची लोकमतने मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, आम्हाला राज्य चालवण्याचा उत्तम अनुभव आहे. पुढल्या पाच वर्षांत काय करायचं हे आमचं ठरलं आहे. शरद पवार यांनी आदर्श सरकार चालवायचं ठरवलं होतं. प्रत्येकाच्या इच्छेतून हे सरकार निर्माण झालं आहे. सरकार नीट चालेल. पडद्यामागच्या गोष्टी पडद्यामागे राहू द्या, असंही संजय राऊत म्हणाले.

उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत – संजय राऊत

कोणतंही खातं कमी जास्त महत्त्वाचं नसतं, सर्व खाती महत्त्वाची असतात. आम्ही खाणारी खाती आमच्याकडे घेतलीच नाहीत, अशी कोपरखळीही राऊतांनी मारली. हे सरकार म्हणजे सुपरहिट सिनेमा आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाने या सिनेमाचा आस्वाद घ्यावा, आम्ही उत्तम अशी कलाकृती बनवली आहे. विरोधी पक्षाने ती भूमिका उत्तम वठवली नाही तर ते चरित्रनायक होतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते माझं सर्वस्व आहेत. शरद पवारांवर माझा विश्वास आहे. बाळासाहेब आणि शरद पवारांचा जनमानसावर पगडा राहिला आहे, असं राऊत बोलले. उद्धव आणि राज ठाकरे हा विषय सोडून द्या, अशी विनंतीही यावेळी संजय राऊतांनी केली. राज आजही माझे मित्र आहेत. मी त्यावेळी त्यांना सांगायला गेलो होतो, असा वेगळा विचार करू नका; पण त्यावेळी गाडी जाळली गेली, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली.

इंदिरा गांधी करीम लालाच्या भेटीला जायच्या; संजय राऊतांचे वादग्रस्त विधान