‘ती’ शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती : संजय राऊत

Devendra Fadnavis - Sanjay Raut

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी  हिचा साखरपुडा रविवारी संपन्न झाला. या समारंभाला राजकीय वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) या समारंभाला आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी समारंभाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या  भुवया उंचावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडून संजय राऊत यांची  विचारणा करण्यात आली.

तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? मी फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारांचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी आवर्जून जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER