राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते १२ जणांची यादी मंजूर करतील – संजय राऊत

Sanjay Raut - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि राज्यपालांमध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे अनेकदादिसून आले आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी १२ जणांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सोपवली आहे. मात्र या नावांवर राज्यपाल मंजुरी देतील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यापाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत, अशी खोचक प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज्यपाल हे सुज्ञ आहे. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे आणि या प्रेमातून यापुढे सर्व कारभार सुरळीत होईल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करतो. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे लोकशाही मार्गाने, संपूर्ण घटनात्मक कायद्याचा आधार घेत सत्तेवर आलं असून त्यावरच चालत आहे. ठाकरे सरकार हे घटनात्मक सरकार आहे. राज्यपाल हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपालांचं जे मत आहे, त्या मताचा आदर आम्ही नेहमी करतो. शेवटी कॅबिनेटचा निर्णयाचे पालन राज्यपालांना करावा लागतो. राज्य सरकारने जी यादी पाठवली आहे, ती घटनेच्या आधारे पाठवली आहे. राज्य सरकारने कधीही घटनाबाह्य काम केले नाही आणि करणारही नाही. राज्य सरकारने ती यादी सर्व पक्षांचे एकमत झाल्यानंतर पाठवली आहे, त्यात काय सांगायचं आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

अभिनेत्री उर्मिला मातोडकरांचे नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिलासारखी स्पष्टवक्ता, देशासह महाराष्ट्राच्या घडामोडींची माहिती असणारी अभिनेत्री जर संसदेत जाईल, तर त्याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER