…तर भाजप पुढची १०० वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाच प्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची १०० वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल.

शरद पवार यांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून फडणवीसांना मार्गदर्शनच मिळाले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. पाच दिवसांपूर्वी मीदेखील शरद पवार यांना भेटलो होतो. त्यापूर्वी शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. त्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडत आहे. ही बैठक पूर्वनियोजित असली तरी पवार-फडणवीस भेटीमुळे या बैठकीला अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे. त्यामध्ये इतके विशेष असे काही नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button