आता कोणाचा राजीनामा मागणार, दिल्ली हिंसाचारावर संजय राऊतांचा मोदींना टोला

Sanjay Raut

मुंबई : आज दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. ट्रॅक्टर रॅलीची सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी डिलीट घुसून मोठ्याप्रमाणात तोडफोड केली. पोलिसांवर हल्ले केले. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही राष्ट्रीय शरमेची ही बाब आहे. आज प्रजासत्ताक दिवस आहे. पूर्ण देश, पूर्ण विश्व आपल्या शक्तीचं, ताकदीचा अनुभव घेत असतं. राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला. असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

दोन महिन्यापासून शांततेने आंदोलन सुरु होतं. जगभरात त्याचं कौतुक होतं. शेतकऱ्यांचं इतकं शिस्तबद्ध आंदोलन जगात कुठे झालं नाही. आज अचानक काय झालं? शेतकऱ्यां चा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. सरकार काय करत होतं? सरकार याच दिवसाची वाट पाहात होतं का? शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटणार होता, तर ती सरकारचीही जबाबदारी होती. आजची ट्रॅक्टर रॅली रोखून शेतकऱ्यांना नीट घरी जाऊ दिलं असतं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिली

शेतकऱ्यांचा संयम तुटत असताना सरकारची काही जबाबदारी नव्हती का? कायदा नेमका कुणासाठी, शेतकऱ्यांचं ऐकलं जात नसेल तर तो कायदा कुणासाठी झालाय? दिल्लीच्या रस्त्यावर आज अराजकता निर्माण झाली आहे. पंजाब अशांत व्हावा, पंजाबच्या लोकांना खलिस्तानी ठरवून अराजकता निर्माण करावी हे षडयंत्र आहे का? आज हे घडायला नको होतं. सरकारने या गोष्टीची जबाबदारी घ्यायला हवी, असं संजय राऊत म्हणाले.

या ठिकाणी दुसरा पक्ष असता किंवा इतर कोणत्या राज्यात हा प्रकार घडला असता तर राजीनामा मागितला गेला असता. आज जी घटना घडली त्याबद्दल कुणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवारांचा राजीनामा मागणार का की जो बायडनचा राजीनामा घेणार? कोण घेणार याची जबाबदारी?, असे सवाल त्यांनी केले.

सरकारच्या अहंकारामुळे हे घडत आहे. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी हे आमचं आवाहन आहे. काल मुंबईत हजारो शेतकरी आले, पण आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

अमित शहांचा राजीनामा मागितला नाही. दिल्लीत इतर कुणाचं सरकार असतं राजीनामा मागितला गेला असता. सोनिया गांधीचा राजीनामा मागितला असता. महाराष्ट्रात घडलं असतं तर उद्वव ठाकरेंचा राजीनामा मागितला असता. जाणूनबुजून आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली जात आहे. गेल्या वर्षी शाहीनबागच्या निमित्ताने ही परिस्थिती निर्माण केली होती. वारंवार अशी परिस्थिती निर्माण करणं हा लोकशाहीला धोका आहे, असा घणाघात त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER