अंतर्गत वादामुळे जर्जर झाला काँग्रेस : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :काँग्रेस (Congress) पक्ष हा देशातील सर्वांत जुना पक्ष आहे. मात्र, काँग्रेसचे वैभव आता राहिलेले नाही. काँग्रेसने तरुण पिढीकडे नेतृत्व दिले पाहिजे. पक्ष अंतर्गत वादामुळे जर्जर झाला असून पक्षाला कायमस्वरूपी नेतृत्वाची गरज आहे, असे परखड मत शिवसेनेचे (Shivsena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा:- काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फटका आघाडी सरकारला बसणार नाही – संजय राऊत

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

खा. राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या प्रमुख २३ नेत्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधींना जे पत्र पाठविले होते, त्यावर वादळ उठले होते. हे वादळ असूनही शमलेले नाही. त्यामुळे अशा वातावरणामुळे काँग्रेस पक्ष खिळखिळा होतोय का अशी मला भीती वाटते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी पुढाकार घेऊन पक्षातील अंतर्गत वादावर तोडगा काढणे आवश्यक असल्याचा राजकीय सल्ला राऊतांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, देशाच्या राजकारणात विरोधी पक्ष टिकले पाहिजेत. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रबळ विरोधी पक्ष आहे. काँग्रेसमधील वादाचा महाराष्ट्र सरकारला फटका बसणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER