सुशांतसिंह प्रकरणः हिम्मत असेल तर भाजपने आदित्य ठाकरेंचे नाव घ्यावे – संजय राऊत

Sushant Singh-Aditya Thackeray-Sanjay Raut

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या (Sushant Singh case) प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारकडे संशयाने पाहिले जात आहे. एवढेच नाही तर सुशांतसिंग प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव जोडले जात आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हस्तक्षेप करत हिम्मत असेल तर भाजपाने आदित्य ठाकरेंच नाव घेऊन दाखवावं असं थेट आव्हान केलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, सुशांतला न्याय देणं हेचं मुंबई पोलीस, सरकारचं दायीत्व आहे. मात्र, बिहारमध्ये निवडणूक असल्याने सुशांतच्या मृत्यूचं राजकारण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, सुशांतप्रकरणी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्शवभूमिवर भाजप (BJP) नेते सुशांतच्या प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली व शिवसेनेने (Shivsena) भाजपला आव्हान देण्यापेक्षा त्यांनीच हे प्रकरण हिम्मत असेल तर, साबीआयला द्यावे असे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारला सुशांतच्या प्रकरणात कोणाला लपवायचे आहे असेही राम कदम यांनी म्हटले आहे. हे प्रकरण सीबीआयला सोपवून मुंबई (Mumbai) पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे असेही राम कदम म्हणाले.

ही बातमी पण वाचा : सुशांतसिंग प्रकरण ; संजय राऊत खोटे बोलत आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER