
मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत आठवणींना उजाळा दिला. शतकातून एकदाच नेते घडतात. हिंदुत्वाची जी लाट निर्माण झाली, त्याचे श्रेय बाळासाहेबांना जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याचं बळ आणि प्रेरणा दिली. त्यांच्यामुळे आज मराठी माणूस उभा आहे.
आज देशात मराठी माणूस अनेक ठिकाणी आहे. त्याचे श्रेय बाळासाहेबांना आहे. बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं. यापुढेही मराठी माणूस अनेक शतकं त्यांचे स्मरण करत राहील. महाराष्ट्रात आज जो भाजप आहे. त्याचं श्रेय बाळासाहेबांनाच जाते. बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली. त्यामुळे भाजप खेड्यापाड्यात पोहोचला. स्थानिक पक्षांचं जे राजकारण सुरु आहे, त्याच्या उगमाला फक्त बाळासाहेबांना जाते.
वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनाच मी हिंदुहृदयसम्राट मानतो. बाळासाहेबांनी एकसंध महाराष्ट्र दिला. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमात सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील. मला बाळासाहेबांची रोज आठवण येते. मी त्यांच्यासोबत 30 वर्षे केलं. लेखणी आणि वाणी ही त्यांची दोन शस्त्र होती. सामाना कार्यालयाची पायरी चढताना मला त्यांची रोज आठवण येते. भाजपला जे आरोप करायचे आहेत, ते करावेत. बाळासाहेब ठाकरेंना कोणीही विसरु शकत नाही.
बाळासाहेबांचे प्रोग्रेसिव्ह हिंदुत्व आहे. त्यानी देशाला दिशा आणि राज्याला दोन मुख्यमंत्री दिले असे संजय राऊत म्हणाले.
ही बातमी पण वाचा : ‘किमान माणुसकी तरी बाळगा’, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांकडून भाजप लक्ष्य
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला