शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भिती कुणाची?, संजय राऊतांने दिले ‘हे’ उत्तर

Amit Shah-Sanjay Raut-Sharad Pawar

पुणे : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांना शरद पवार की अमित शाह (Amit Shah), यांच्यापैकी अधिक भिती कुणाची?, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या बेधडक अंदाजात उत्तर दिले .

भिती कशाला हवी कोणाची…? शरद पवार किंवा अमित शाह भितीदायक आहेत, असं मला वाटतं नाही … एक आहे की त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांची भिती आवश्यक आहे. शरद पवारांची भिती असण्याचं काही कारण नाही. त्यांच्याइतका लोकांमध्ये जाणारा लोकनेता मी पाहिला नाही”, असे राऊत म्हणाले आहेत .

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही लोक घाबरायचे. पण त्यांना भेटायचे तेव्हा त्यांच्या प्रेमात पडायचे. त्यामुळे पवार किंवा शाह यांना घाबरण्याचं तसं काही कारण नाही, असे राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER