संजय राऊत सिल्व्हर ओकवर, पवारांसोबत १ तास खलबत

Sanjay Raut & Sharad Pawar

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवरअसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आणि अशातच शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज ( ३० नोव्हेंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राऊत यांनी स्वत: ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे

“आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह थक्क करणारा आहे. संकट आणि असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित”, असं संजय राऊत ट्विटरवर म्हणाले.

दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर याना उतरवण्यात आले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे माझा पराभव झाल्याची माहिती देत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. आत त्या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. संजय राऊत यांनीदखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे उद्या (१ डिसेंबर) पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER