
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून सतत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज चक्क राज्यपालांना साष्टांग दंडवत घातल्याचे दिसून आले. राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर झळकत आहे.
ही बातमी पण वाचा:- यावेळी मात्र संजय राऊतांनी राज्यपालांना घातला साष्टांग दंडवत
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर मतभिन्नता दिसून येत आहे. यावरून संजय राऊत नेहमीच राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत असल्याचे दिसून आले. मात्र आज संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नेहमी राज्यपालांविषयी आगपाखड करणारे राऊत मात्र यावेळी शांत दिसले.
राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मधुर संबंध आहेत. त्यांचे पिता-पुत्रासमान संबंध असून, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, ते आमच्यासाठी मार्गदर्शक आणि आदरणीय आहेत. आज सदिच्छा भेट होती. राज्यपाल हे घटनात्मक पद, ते या राज्याचे पालक, ते प्रियच असतात. याला राजकारणाशी जोडू नये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला