संजय राऊतांनी शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने भूमिका मांडली असावी : अजित पवार

Ajit Pawar - Sanjay Raut - Maharastra Today

मुंबई: पुणे महापालिका निवडणुकीत(Pune Muncipal Election) शिवसेना ८० जागा जिंकेल. किंग किंवा किंग मेकर असू, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले मत मांडले . प्रत्येकजण पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका मांडत असतात. त्यातून त्यांनी मांडली असावी, असे पवार म्हणाले . पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.

आगामी महापालिकेत प्रभाग २,३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की ,सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.

दीड ते दोन महिन्यांनंतर पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसत आहे. पुण्यातील वाढत्या गर्दीवर चिंता व्यक्त करत अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केले .

गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका.त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावे , असे आवाहन अजित पवार यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button