संजय राऊत शहांवर कडाडले; हस्तियाँ डूब जाती हैं… म्हणत साधला निशाणा

Amit Shah - Sanjay Raut

मुंबई : आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केल्यानंतर त्याच शैलीत शिवसेनेकडून (Shiv Sena) त्यांना उत्तर दिले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा ट्विट करत भाजपचे पुन्हा एकदा कान टोचले आहेत. “घमंड ज्यादा हो तो हस्तीयाँ डूब जाती हैं… ” म्हणत त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की-

तुफान ज्यादा हो तो,
कश्तियाँ डूब जाती है
और घमंड ज्यादा हो तो,
हस्तीयाँ डूब जाती है

शिवसेनेने भाजपचा (BJP) हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर ७ फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शहा यांनी ‘शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्त्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.’ असे वक्तव्य केले होते. तब्बल दीड वर्षांनी अमित शहा यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधल्यामुळे शहा यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले होते. त्यानंतर राऊत यांनी शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेत “१९७५ साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर १९९० मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली, असे ट्विट केले होते. त्यांनतर हा वाद इथेच न संपता राऊत यांनी आज (सोमवार) पुन्हा ट्विट करत गर्व असणाऱ्या कित्येक व्यक्तींचे अस्तित्व संपलेले आहे, असे म्हणत शहा यांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER