‘संजय राऊत, जयंत पाटील यांच्याकडून फेक न्यूज देण्याची अपेक्षा नाही’, भाजपचा टोला

Sanjay Raut - Jayant Patil - Keshav Upadhye - Maharastra Today
Sanjay Raut - Jayant Patil - Keshav Upadhye - Maharastra Today

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय (CBI) चौकशीचे आदेश दिले होते. यावरून आता राजकारण तापू लागले आहे. सीबीआयच्या छापेमारीवरून संजय राऊत (Sanjay Raut) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर टीका केली. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही, असा टोला भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी लगावला आहे.

उपाध्ये यांनी एक ट्विट करून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. केशव उपाध्ये यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशपत्रातील काही मजकूर फोटोच्या माध्यमातून या ट्विटसोबत शेअर केला असून, तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही, असा टोला लगावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला कधीही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. या आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास कायद्यानुसार पुढे जाण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशपत्राचा फोटोही केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये टाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google buttonSanjay Raut – Jayant Patil – Keshav Upadhye – Maharastra Today