संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचे काम करत आहेत – प्रसाद लाड यांची टीका

Prasad Lad & Sanjay raut

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचे काम करत आहेत. वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवत आहेत, अशी टीका भाजपाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली. (Prasad lad Attacked Cm uddhav Thackeray And Sanjay raut)

आजच्या सामना रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी टीका केली आहे की, मोदी शहा यांच्या मनमानीने आणि चार-पाच उद्योगपती मिळून देश चालला आहे. राऊतांचा आरोप बिनबुडाचा आरोप आहे. वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही, असे लाड म्हणालेत.

पूर्णवेळ मुख्यमंत्र्याची गरज

मोदींवर टीका करण्यापेक्षा राऊतांनी राज्यातचे पाहावं. राज्याला सध्या पूर्णवेळ मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आम्ही पण म्हणू शकतो की एकच माणूस महाराष्ट्र चालवतो आहे. पण, सरकारमधील मंत्री आणि पक्ष आपापल्या पद्धतीनुसार निर्णय घेत असतो. हा सरकार आणि पक्षीय पातळीवर ज्याचा त्याचा विषय आहे, असे लाड म्हणाले.

सीडी लावाच, खडसेंना आव्हान

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अगदी दोन महिन्याच्या आतच त्यांना ईडीची नोटीस आली आहे. याविषयी दरेकर या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणालेत, नाथाभाऊंनी काही चूक केली नसेल तर घाबरु नये. ईडीला सहकार्य करावे. राहिला विषय त्यांच्या सीडीचा, त्यांच्याकडे असलेली सीडी त्यांनी खुशाल लावावी, असे आव्हान लाड यांनी नाथाभाऊंना दिले.

केंद्राने निधी दिला नाही, आरोप चूक

केंद्र सरकारने कोरोना काळात निधी दिला नाही, हा महाविकास आघाडीतील नेत्यांचा आरोप चूक आहे. कोरोना काळात राज्यावर आर्थिक संकट आहे तसे केंद्रावर पण आहे. त्यातूनही केंद्राने राज्याला भरघोस मदत केली आहे. राज्यातील अनेक विकासकामे आहेत, ती आता सरकारने पूर्ण करायला हवीत, असे लाड म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER