संजय राऊत हे फार विद्वान आहेत : चंद्रकांत पाटील

Sanjay Raut - Chandrakant Patil.jpg

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिणारे राज्यपाल कोश्यारी हे संविधानातील ‘सेक्युलॅरिझम’ मानत नाहीत का, असा प्रश्न शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यावर, ‘सर्वधर्मसमभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का?’ असा प्रतिप्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला.

‘आम्ही फक्त हिंदूंच्यासाठी मंदिरे उघडा अशी मागणी केलेली नाही. सगळीच प्रार्थनास्थळे  उघडा अशी आमची मागणी आहे. संजय राऊत हे फार विद्वान आहेत. ’ असा टोला त्यांनी हाणला. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी खा. राऊत यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात मंदिरे उघडण्यावरून सध्या लेटरवॉर सुरू  आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मध्येच टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्यावर निशाना साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER