संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Devendra FadnaviDevendra Fadnavis-Sanjay Rauts-Sanjay Raut

मुंबई :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) इतके मोठे नेते नाही की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यावे. केंद्रीय सचिवांकडे जो अहवाल दिला आहे, तो लवंगी फटका आहे की बॉम्ब आहे हे लवकरच कळेल’, असा टोला फडणवीसांनी लगावला.

फोन टॅपिंग (Phone Trapping) प्रकरणामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं या मागणीसाठी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही प्रश्न विचारण्यात आले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राऊतांसंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना, राऊत यांच्याकडे खूप वेळ असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याइतके ते मोठे नेते नाहीत असं मत व्यक्त केले .

आपल्याला कल्पना आहे की ज्या घटना सध्या बाहेर येत आहे ते चिंताजनक आहे. त्याही पेक्षा खेदजनक आहे की मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. शरद पवार बोलले पण त्यांनी प्रकरणाचा बचाव केला. काँग्रेसची भूमिका वेगळीच आहे. केवळ सत्तेसाठी सगळं चालले आहे. माझा काँग्रेसला सवाल आहे की त्यांना किती वाट हिस्सा मिळतो ते सांगावे’, असा सवाल फडणवीस यांनी काँग्रेसला विचारला.

आम्ही राज्यपालांना सांगितलं की जर मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलत करावं आणि मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा. मूळ घटना पाहिली पाहिजेच पण त्याच्या पाठीमागे जे चाललं आहे ते ही पाहवाचं लागेल जे बदलीच रॅकेट आणि वसुलीचं जे रॅकेट आहे ते ही पाहावं लागेल. यांच्यात नैतिकता नाही. कारण ज्यांनी प्रकरण पुढे आणलं त्यांच्यावर कारवाई केली पण ज्यांनी यात फायदा घेतलं त्यावर काही कारवाई केली नाही,अशी टीका फडणवीस यांनी केली.

‘हे मनमानी करणार सरकार आहे. कोरोनाकडे तर यांचं लक्षच नाही. मला कळत नाही की महाराष्ट्रातच का कोरोना का वाढतोय. मुनगंटीवार यांनी 100 गोष्टी दाखवून दिल्या आहेत. जेव्हा सरकारने सवैधानिक कर्तव्य बजावले नाही. हा अहवाल बाहेर आल्यानंतर कोणाचे चेहरे पुढे येतील या भीतीने तुम्ही लपवून ठेवलं. ते कोण लोक आहेत, ज्यांच्या वर या माध्यमातून पुढे येणार आहेत. म्हणून तुम्ही लपवून ठेवले’, असा आरोपही फडणवीसांनी केली.

ही बातमी पण वाचा : फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER