संजय राऊत ना धड पत्रकार ना धड राजकारणी, अर्धवटराव; काँग्रेसची टीका

Sanjay Raut-Ratnakar Mahajan

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sharad Pawar) अनेक वेळा काँग्रेसवर बोचरी टीका करत असतात. आता काँग्रेसने संजय राऊत (Sanjay Raut) यांना उत्तर दिले आहे. काँग्रेसचे नेते रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) यांनी राऊतांना टोमणा मारला – धड ना पत्रकार, ना राजकारणी अशा अर्धवटरावांनी काँग्रेस  (Congress) पक्षाचा इतिहास, त्याची धोरणे, कार्यक्रम, जनाधार याविषयी अडाणीपणाची लेखनकामाठी करून आपली हौस भागवून घेऊ नये.

पुढे महाजन यांनी राऊतांना सल्ला दिला आहे – स्वतःच्या पक्षाचा इतिहास, विचारशून्य राजकारण व वाटचाल आणि केवळ सत्तापदावरून ऐन वेळी मारलेली कोलांटी यावर आत्मपरीक्षण करावे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) हे तीन पक्ष आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सरकारमध्ये दबदबा आहे.

संजय राऊत अनेक वेळा काँग्रेसवर बोचरी टीका करत असतात. सरकारमधील काँग्रेसच्या असंतोषाची त्यांनी ‘काँग्रेसची कुरकुरणारी खाट’ अशी संभावना केली. सतत काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर मतप्रदर्शन करत असतात. याबाबत राऊतांना समज देताना महाजन म्हणाले – आघाडीच्या राजकारणात सहकारी पक्षावर भाष्य करताना संयम बाळगावा लागतो याचेही राऊतांनी भान ठेवावे. काँग्रेस पक्ष हा त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालेला दिसतोय.

त्याची मलाही वेदना आहे. मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते, असे संजय राऊत म्हणाले होते. मधल्या काळात २३ नेत्यांनी जे काही सोनिया गांधींना पत्र पाठवलं, त्यावरचा वाद अजून शमलेला नाही. त्यातून काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होतोय की काय, अशी मला भीती वाटते. त्या २३ नेत्यांची मागणी योग्य आहे. काँग्रेसला योग्य नेतृत्व मिळावे, यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्लाही राऊत यांनी दिला होता, हे उल्लेखनीय.

ह्या बातम्या पण वाचा : 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER