राऊत साहेब, तुमचा रोष नक्की कोणावर ?

शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मंगळवारी अग्रलेख लिहिला आहे. हॉकर मुलांचा जीव धोक्यात राहू नये या अतिशय उदात्त हेतूने सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे प्रकाशन सध्या बंद आहे. मात्र सामना डॉट कॉम सुरू आहे. त्यावरच राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करणारा अग्रलेख लिहिलाय.”टाळ्या,थाळ्या आणि दिवे; अशाने युद्ध हरू” असा इशारा शीर्षकातच त्यांनी दिला आहे त्यांनी फक्त मोदींनाच टार्गेट केले असते तर ते एक परी समजता येऊ शकले असते, पण त्या टीकेच्या आड त्यांनी कोरोनाच्या रुग्णांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून टाळ्या वाजवणारे भारतीय लोक यांची तुलना ही मरकजवाल्यांशी केली हे मात्र खटकलेच. राऊत नेमके काय म्हणाले त्यांच्या शब्दात वाचा,” कोरोना युद्धाची स्थिती पानिपतसारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवरावभाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत त्यात स्वतःचे कपडे जळू नयेत. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले ते घडावे उलट मागणार्‍यांना अद्दल घडवावी. फक्त मरकजवाले नियम मोडतात असे नाही.मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत?”

टाळ्या आणि दिवेवाल्यांपैकी बोटावर मोजण्याइतक्या लोकांनीच शिस्त पाळली नाही पण संयम पाळूनच सम्पूर्ण देश कृतज्ञताभाव आणि एकजूट व्यक्त करीत होते हे इतर देशाने पाहिले आहे. ते राऊत यांना दिसले नसावे किंवा त्यांना ते बघायचे नसावे.ज्यांना चांगले दिसतच नाही

त्यांनी बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या कृतीचे भांडवल केले, हे जे गोंधळी होते त्यांचे समर्थन कोणीच करणार नाही पण राऊत यांनी,”फक्त मरकजवालेच नियम मोडतात असे नाही, मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत” असा सवाल करीत टाळ्या वाजवताना व दिवे लावताना अतिउत्साहाचे प्रदर्शन करणाऱ्या लोकांची तुलना मरकजवाल्यांशी केली.

मरकजवाल्यांनी सगळा देश वेठीस धरला आहे. देशात आज कोरोनामुळे जे भयग्रस्त वातावरण आहे ते तयार होण्यात दिल्लीहून गावोगावी पोचलेले मरकजवाले कारणीभूत आहेत हे आता लपून राहिलेले नाही. मरकजवाल्यांच्या संपर्कात जे जे आले त्यांना त्यांना कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. दिवे लावताना वा टाळ्या वाजवताना काहीसा अतिउत्साह दाखविणाऱ्या आणि संख्येने अगदीच नगण्य असलेल्या त्या लोकांमुळे कोठेही कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. टाळ्या वाजवून आता पंधरा दिवस झाले आहेत.या पंधरा दिवसात त्यादिवशी टाळ्या वाजवताना अतिउत्साह दाखवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असे एकही उदाहरण समोर आलेले नाही. त्यामुळे मरकजवाल्यांविरुद्ध अफवा पसरविणारे आणि मरकजवाल्यांची तुलना त्या अतिउत्साही लोकांशी करणारे या दोघांचाही प्रमाद सारखाच आहे. संयम दोघांनीही पाळणे आवश्यक आहे.

सगळा देश आज मरकजवाल्यांना दोष देत असताना त्या दोषाचा फोकस दुसरीकडे वळवण्याचा राऊत यांचा प्रयत्न आहे का? हे आपण कोणाच्यातरी प्रेमाखातर करत आहात ? हे सांगायची आवश्यकता नाही पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे आपल्या तब्बेतीची काळजी न करता दिवसरात्र कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शर्थ करीत आहेत. संपूर्ण यंत्रणा त्यांनी सक्रिय केली आहे. राज्यातील जनतेच्या मदतीने कोरोनावर मात करणारच असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांनी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली नाही. मरकजबद्दल काही बोलणे देखील त्यांनी टाळले आहे. एकीकडे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाच्या मुकाबल्यासाठी पंतप्रधानांना सहकार्य करण्याची भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे राऊत हे मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला तडा जाईल असे लिहित आहेत.

विशेष म्हणजे अशा आपत्तीच्या वेळी विरोधी पक्षाने सरकार वर कुठलीही टिका करायची नाही हे ठरवल्यावर, राऊतसाहेब यांना हे पण भान राहिलेले नाही . महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ होताना कोणाला विचारले नाही, मुखपत्रात कोणाचे पंख छाटले गेले याचा हिशेब करण्याचा हा काळ नाही.

ANIL DESHMUKH on Twitter

निजामुद्दीन, दिल्ली येथील तब्लीगी मर्कज़ मध्ये जी लोकं सामील झाले होते त्यांतील अजूनही ५०-६० जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यंना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वॉवरनटाय्न मध्ये भरती व्हावे.