संजय राऊत हे पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याहीसुद्धा धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत…

Rajesh Narvekar-Sanjay Raut

मुंबई :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलीचा आज साखरपुडा होणार आहे. या सोहळ्याला सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचा गोतावळा जमणार आहे. मात्र, ज्या संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भुमिका निभावली आहे. शिवसेनेचे खास नेते म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा जावई कोण – व्याही कोण याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सामान्यांना लागली आहे.

तर, राऊत यांचे व्याही आणि जावईसुद्धा राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत.

संजय राऊत यांचे होणारे व्याही राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

कोण आहेत राजेश नार्वेकर आणि त्यांचे कार्य –

राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी रत्नागिरी (Ratnagiri) आणि रायगड जिल्ह्यात काम केले आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. तसेच त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालखंडात रायगड जिल्हा हगणदारीमुक्त झाला. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची बदली ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी झाली.

कोरोना काळात उत्तम कामगिरी

राजेश नार्वेकर यांनी कोरोना काळात ठाण्यात अत्यंत चांगलं काम केलं. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी कठोर उपाययोजना अवलंबल्या होत्या. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपालन व्हावं म्हणून त्यांनी यंत्रणा कामाला लावली होती. तसेच लॉकडाऊन काटेकोर पाळला जावा म्हणून जमावबंदी सारखे आदेशही त्यांनी काढले होते. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवरही त्यांनी जरब बसवली होती. त्याशिवाय आरोग्य यंत्रणाही त्यांनी सुसज्ज ठेवल्या होत्या. रोज बैठका घेणं, अधिकाऱ्यांशी संवाद साधणा, रुग्णालयांना भेटी देणं आदी गोष्टींवर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या कामांची अनेकांनी स्तुतीही केली होती.

तर,नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.

उर्वशी राऊत हिचा साखरपुडा कुठे आहे –

संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच आज सायंकाळी 7 वाजता ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा होणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी यांचा साखरपुडा होणार आहे. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग! ; संजय राऊतांच्या कन्येचा साखरपुडा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER