
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ही मुलाखत लवकरच सामनातून प्रसिद्ध होणार आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून कोरोनाचं संकट, ईडीच्या चौकश्या, मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून झालेलं राजकारण, सत्ताबदलाचे विरोधकांकडून होत असलेले दावे आणि बिहार विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल… या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत काय भाष्य केलं याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.
मात्र, राऊत यांनी मुलाखतीचे मुद्दे गुलदस्त्यात ठेवल्याने या मुलाखतीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुलाखत घेतानाचे तीन फोटो शेअर केले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत. लवकरच…’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दैनिक ‘सामना’तून प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी पण वाचा : ‘आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, पत्ते तुम्ही पिसताय, उद्या डाव आम्ही उलटवू’ – संजय राऊत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला