संजय राऊतांनी काँग्रेसला डिवचले, म्हणाले ‘काँग्रेसचे नेतेही शिवसेना संपण्याचे बोलले होते’

Sanjay Raut

मुंबई : भाजप हा पक्ष शिवसेनेच्या विचाराने चालत नाही. तसे करायचेच असते तर आज महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, असे विधान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज केले आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेला संपवण्याची भाषा झाली तेव्हा शिवसेना अधिक झळाळून उठली आहे, अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले. मात्र त्यांनी ट्विट करताना काँग्रेसच्या नेत्यांचं नाव घेत काँग्रेसलाच पुन्हा डिवचले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज होणार असे बोलले जात आहे.

1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर या ट्विटमधून संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संजय राऊत यांच्या ट्विटमुळे एकप्रकारे काँग्रेस नेते कशाप्रकारे तोंडघशी पडले, हे प्रतित होत आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत डावलले जात असल्यामुळे अगोदरच असंतुष्ट असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणखी नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER