संजय राऊत : घर का ना घाट का; देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra FadnaviDevendra Fadnavis-Sanjay Rauts-Sanjay Raut

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट घेतली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणालेत – संजय राऊत यांची अवस्था ‘ घर का ना घाट का’ अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. (bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये आले होते. नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोललेत. संजय राऊत यांची अवस्था ‘घर का ना घाट का’ झाली आहे. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढू नका. पण ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत तेच कळत नाही! आता ते संपादकही नाहीत. ज्यांच्याकडे लक्ष जात नाही, ते लोक आपल्याकडे लक्ष वेधण्याचे काम करत असतात. राऊतही तेच करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : …तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button