संजय राऊतांचा गजनी झाला, त्यांना पराभवाचा विसर पडला – निलेश राणे

Nilesh Rane - Sanjay Raut

रत्नागिरी : बिहार विधानसभा निवडणुकांचा (Bihar Assembly Elections) निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार निवडणुकीच्या निकालात एनडीएची (NDA) बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहार निवडणुकीत शिवसेनेला अनेक ठिकाणी नोटापेक्षा कमी मते मिळाल्यानं माजी खासदार निलेश राणेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. रत्नागिरीत (Ratnagiri) पत्रकार परिषदेत निलेश राणे बोलत होते.

संजय राऊतांचा गजनी झाला आहे. त्यांना पराभवाचा विसर पडला आहे. शिवसेनेचा पराभव जसा बाहेर होतो, तसा महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे, असा टोला राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावला. तर शिवसेनेची लायकी काय होती हे आम्हाला माहिती होतं. संजय राऊत विसरले होते, गोव्यामध्ये ही तसेच झालं होतं. गोव्यामध्ये सर्व मिळून ९०० मते शिवसेनेला मिळाली होती, असा उपहासात्मक टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावलाय.

सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा कलानगरवर निशाणा साधला. या प्रकरणात कलानगरचे एक नाव आहे, या प्रकरणी वेगवेगळी पात्रं आहेत, खरे कलाकार कलानगरमध्ये लपून बसले आहेत. या रॅकेटची जी काही लोकं आहेत, त्या सर्वांना एनसीबीने उचलले पाहिजे, नुसते प्यादे उचलून चालणार नाही. अर्जुन रामपाल एक सप्लायर आहे, तो कोणाला सप्लायर करत होता याचा तपास एनसीबीने करायला हवा, असं माजी निलेश राणेंनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER