केंद्र राज्यातील वितुष्टामुळे देशाचे तुकडे होतील, संजय राऊत याना वाटते भीती

Sanjay Raut

मुंबई :- केंद्र आणि राज्यातील संबंध बिघडत आहेत. त्यातून संघराज्याच्या स्वरूपात असणाऱ्या आपल्या देशाचे रशियासारखे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.

सामनामध्ये लिहलेल्या ‘रोखठोक’ सदरात राऊत यांनी केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाबाबत चर्चा केली आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी आपण लोकांना दुखावतो आहोत, हे केंद्र सरकारच्या लक्षात आले नाही तर भारताचे रशियासारखे तुकडे होतील. २०२० या वर्षाने केंद्र सरकारच्या क्षमता आणि विश्‍वासाहर्ता यांच्यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पण सत्ताधाऱ्यांना या चळवळीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सरकारच्या या कृतीचे एकमेव कारण म्हणजे कमकुवत विरोधी पक्ष. लोकशाहीच्या या अध:पतनाला केंद्र किंवा मोदी शहांच्या सरकारपेक्षा विरोधी पक्षच अधिक जबाबदार आहेत. सध्याच्या काळात सरकारवर टीका करण्यापेक्षा विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे सामानाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मध्य प्रदेशचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले, असे विधान भाजपाचे नेते विजयवर्गीय यांनीच केले आहे. राज्य सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान विशेष स्वारस्य दाखवत असतील तर देशाचे काय होईल? असा सावाल राऊत त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ‘या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवं’ – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER