संजय राऊत यांनी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही – आशिष शेलार

Sanjay Raut - Ashish Shelar

मुंबई : भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांना सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसऱ्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौतच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नसल्याचे शेलार म्हणाले आहेत.

“सुशात सिंह राजपूतच्या प्रकरणातून जेवढी वळणं, या चौकशीला वेगवेगळ्या दिशेनं नेता येईल तेवढा प्रयत्न, काही राजकीय मंडळी वारंवार करत आहेत. हे महाराष्ट्र व देश बघतो आहे. आजच ज्या पद्धतीचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले, त्यावर आमची स्पष्ट भूमिका आम्ही मांडत आहोत . तसेच राऊत यांनादेखील आमचं सांगणं आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये चौकशीतल्या गोष्टींचा विपर्यास किंवा दुसऱ्या दिशेने नेण्यासाठी कंगना रणौत हिच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असताना, कुठल्याही अशा पद्धतीच्या वक्तव्यावर वातावरण तापवण्यापासून सगळ्यांनी स्वतःला वाचवले पाहिजे, असेदेखील शेलार यांनी यावेळी बोलून दाखवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER