
मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज (5 डिसेंबर) लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर पुढील दोन दिवस संजय राऊत घरीच आराम करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती.
माहितीनुसार, संजय राऊत यांना आज (5 डिसेंबर) लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी 11 च्या दरम्यान संजय राऊत लीलावती रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले. डॉक्टरांनी संजय राऊतांना यांना आराम करण्यास सांगितला आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस ते घरीच आराम करतील. यानंतर सोमवारपासून (8 डिसेंबर) ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना ऑफिसला जातील, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला