बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेला हरताळ लावण्याचे काम संजय राऊतांनी केले : रामदास आठवले

Sanjay Raut-Ramdas Athawale

मुंबई :- हाथरसची (Hathras) कन्या मृत्युची झुंज देत होती तेव्हा आयुष्यमान आठवले नटींच्या घोळक्यात होते, अशी टीका राऊतांनी (Sanjay Raut) अग्रलेखातून आठवलेंवर केली होती. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) पलटवार केला आहे .

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) कलावंतांचा आदर करणारे होते. मात्र बाळासाहेबांच्या या भूमिकेला हरताळ लावण्याचे काम संजय राऊतांनी केले असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे अनेक कलावंतांशी चांगले संंबंध होते. एखाद्या महिलेवर अतिप्रसंगाचा एवढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू न घेता राऊतांनी तिच्याविषयी अपशब्द कढले, असे म्हणत आठवलेंनी रांऊतांवर टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER