संजय राऊत यांच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार

Supriya Sule - Sharad Pawar - Purvashi Raut - Sharad Pawar - Sanjay Raut - Varsha Raut

मुंबई :  शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. राऊत यांची कन्या पूर्वशी ही लवकरच लग्नबंधनात अडणार आहे. मल्हार नार्वेकर यांच्याशी तिची लग्नगाठ बांधली जाणार आहे. मल्हार नार्वेकर (Malhar Narvekar) हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे सुपुत्र आहेत. येत्या ३१ तारखेला पूर्वशी आणि मल्हार यांचा मुंबईत साखरपुडा होणार आहे. या सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांनाही या साखरपुड्याचे निमंत्रण दिले. त्यासाठी संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. सुरुवातीला संजय राऊत यांच्या सिल्व्हर ओकवरील सहकुटुंब भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

ही भेट नक्की कोणत्या कारणासाठी आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, थोड्या वेळात ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संजय राऊत सहकुटुंब दैनिक ‘सामना’च्या कार्यालयातही गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER