उद्धव ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग! ; संजय राऊतांच्या कन्येचा साखरपुडा

sanjay-raut-daughter-purvashi-raut-engagement-ceremony-today

मुंबई: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या कन्येचा आज मुंबईत साखरपुडा आहे. या मंगलप्रसंगी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) या सोहळ्यानिमित्त एकत्र येणार असल्याची महिती समोर येत आहे .

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पुन्हा एकदा हे दिग्गज नेते एकत्र येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच आज सायंकाळी 7 वाजता ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा होणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी यांचा साखरपुडा होणार आहे. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. त्यानिमित्ताने राऊत यांनी मोजक्याच मान्यवरांना या मंगल सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिलं आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साखरपुड्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या सोहळ्यानिमित्ताने हे सर्व दिग्गज नेते एकत्र येणार आहेत.

याअगोदर संजय राऊत यांनी कन्येच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेतली होती. यावेळी राऊत यांच्या सोबत त्यांची पत्नी वर्षा राऊत, मुलगी पूर्वशी हे देखील उपस्थित होते. यावेळी पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

याच दरम्यान, वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर राऊत पवारांना सहकुटूंब भेटल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते . मात्र, राऊत यांनीच मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER