आंदोलनकर्त्यांना मोदी म्हणाले ‘आंदोलनजीवी’, संजय राऊत म्हणाले ‘आम्हाला अभिमान’

Pm Modi - Sanjay Raut

मुंबई : शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत बोलताना आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर सडकून टीका केली. आपण यापूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकले होते. पण आता आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे, अशा शब्दात मोदींनी सर्व आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांवर जोरदार टीकास्त्र डागलं होतं. त्यावर आता शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

‘होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!’ आणि ‘गर्वसे कहो हम आंदोलनजीवी है. जय जवान, जय किसान’, असे दोन ट्वीट संजय राऊत यांनी केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटोदाखवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER