बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला?, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut-PM Modi-Maharashtra Today

मुंबई: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Agitation) आज 46 वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकारमधील सलग 8वी बैठक निष्फळ ठरली आहे. नवे कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्याकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

आजचा सामनातील रोखठोक…

सध्या आपल्या देशात नक्की काय सुरू आहे ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे कोरोनाचा नवा स्टेन्स घेऊन 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात अवतरणार होते, पण इंग्रज हे जात्याच शहाणे असल्याने जॉन्सन साहेबांनी आता दिल्लीस येण्यास नकार दिला. वर्षभरापूर्वी प्रे. ट्रम्प हे अहमदाबादेत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अवतरले तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्याभोवती असलेल्या अमेरिकन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला व निघून गेले. ते प्रे. ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत. प्रे. ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरले, पण निवडणुकीच्या विरुद्ध गेलेला निकाल फिरवावा व आपल्यालाच विजयी घोषित करावे यासाठी प्रे. ट्रम्प निवडणूक निर्णय अधिकाऱ्य़ांकडे कसे गयावया करीत होते याबाबतचा गौप्यस्फोट आता झाला आहे. प्रे. ट्रम्प यांनी सत्ता टिकविण्यासाठी झुंडशाहीचे शेवटचे टोक गाठले. आपल्या गुंड समर्थकांना त्यांनी अमेरिकेच्या संसदेत घुसवून हिंसाचार केला. त्यात संसदेतच गोळीबार झाला. अमेरिकेच्या इभ्रतीची आणि लोकशाहीची पुरती लक्तरे त्यात निघाली. अमेरिका असेल किंवा हिंदुस्थान, आता लोकशाही ही शोभेचा आणि पोकळ डोलारा म्हणूनच उभी आहे. निवडणूक निकाल फिरवावा म्हणून ट्रम्प यांनी गयावया केली. हिंदुस्थानी लोकशाही पद्धतीत अशी गयावया वगैरे करावी लागत नाही. विरोधात उभे राहणाऱ्य़ांना नष्ट केले की काम भागते आणि निवडणुकांचे निकाल ठरवून घेतले की झाले! लोकशाही या संस्थेवरील लोकांची श्रद्धा आता पूर्ण उडाली आहे! असा टोला संजय राऊतांनी मोदींवर लगावला आहे.

स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठई 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय?, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केली आहे.

जॉन्सन यांच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरुन टीका

“सध्या आपल्या देशात नक्की काय सुरु आहे हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे कोरोनाचा नवा स्टेन्स घेऊन 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अवतरणार होते, पण इंग्रज जात्याच शहाणे असल्याने जॉन्सन साहेबांनी आता दिल्लीस येण्यास नकार दिला. वर्षभरापू्र्वी प्रे. ट्रम्प हे अहमदाबादेत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अवतरले तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्या भोवती असलेल्या अमेरिकेन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला आणि निघून गेले. ते प्रे. ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत.”

टाटा मोठे का?

दिल्लीची रया पूर्ण जाताना दिसत आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे सगळ्यात मोठे आंदोलन सुरु असतानाही दिल्लीच्या सत्तावर्तुळात साधी सळसळही जाणवत नाही. पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी-वाऱ्यात कुडकुडत उभा आहे. या आंदोलनात 57 शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्यांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणुसकी नसलेले सरकार कोणत्या ‘शाही’त बसते? टाटांसारखे लोक मोठे का? हे अशा वेळी समजते. आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्याला त्याच्या छोट्या घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले ‘टाटा’ हे भारतरत्न का झाले अव अंबानी-अदानी यांना ‘टाटां’ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत आहे. हे टाटादेखील सध्या मोदी नितीचे समर्थक आहेत.

ही एकप्रकारे आणीबाणीच- राऊत

आज देश व राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. लोकसभेचे तरी सार्वभौमत्व उरले आहे का? लोकसभेच्या सार्वभौमत्वाची जागा पंतप्रधानांच्या सार्वभौमत्वाने घेतली आहे. गेल्या काही वर्षात एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, पण दिल्लीच्या सीमेवर 45 दिवस मरत असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी कायद्यात दुरुस्ती करायला सरकार तयार नाही. कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असेलही, पण त्यावर लोकसभेत चर्चा तरी होऊ द्या! सध्या काय सुरु आहे त्याची तुलना आणीबाणीशीच करता येईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.

ही बातमी पण वाचा :“उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा…” शिवसेनेचा मोदींना चिमटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER