देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करतायत; संजय राऊतांचा टोला

Sanjay-Raut-Bhagat-Singh-Koshyari

मुंबई : विधानपरिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, सध्या भगतसिंह कोश्यारी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे खूपच काम करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे . ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- मुख्यमंत्री दोन दिवसात कोकणाला मोठी मदत करणार – संजय राऊत

उच्च न्यायालयाने राज्यपालांना विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली होती. याविषयी राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, उच्च न्यायालयाने जे राज्यपालांना विचारले ते आम्ही सरकार म्हणून कितीतरी दिवसांपासून विचारतोय. मात्र, राज्यपाल त्या फाईलवर बसले आहेत. हा सरकारचा अपमान आहे. विधानपरिषदेवर राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती न करणं हे घटनाविरोधी असल्याचे संजय राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button